नालासोपारा : मुलाने आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपारा पश्चिमेकडील इम्पेरिअल टॉवरमधील सी विंगमध्ये ही घटना घडली आहे. जिमसेन पवार असेल हल्लेखोर मुलाचं नाव आहे.


जिमसेननं वडील नरेंद्र पवार आणि आई नम्रता पवार यांच्या अंगावर चाकू, सुरा आणि स्क्रू ड्रायव्हरने जवळपास 35 वार केले. सध्या त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलगा जिमसेन घटनेनंतर फरार झाला आहे.

जिमसेन आणि त्याचे वडील हे शेअर बाजारात ट्रेडिंग करत असत. रविवारी रात्री जेवताना या दोघांत यावरुन भांडण झालं होतं. या भांडणानंतर सोमवारी पहाटे तीन वाजता जिमसेनने घरातील चाकू, सुरा, स्क्रू ड्रायव्हरने वडिलांवर हल्ला केला. घरातील आरडाओरडा ऐकून जिमसेनची आई मधे पडली. त्यावेळी या नराधम मुलाने आईवरही वार केले.

फरार जिमसेनविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. पवार कुंटुंबिय आठ दिवसापूर्वीच सोसायटीमध्ये राहायला आले होते. त्यामुळे सोसायटीतील लोकांना त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही.

जिमनेस हा जास्त कुणामध्ये मिसळत नव्हता. जिमनेसचे आई-वडील त्याला घरातून जास्त बाहेर सोडत नव्हते. बाहेर जाताना कधी कधी त्याला घरात ठेवून बाहेरुन टाळा लावत होते. त्यामुळे जिमसेन नैराश्येत गेले होता. त्यातूनच त्याने आपल्या आई-वडिलांवर हल्ला केल्याचा अंदाज त्याच्या मित्रांनी व्यक्त केला आहे.