काँग्रेस सातत्याने राफेल विमान खरेदीत विमानांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करत आहे. यूपीए सरकारच्या काळात राफेल डीलमध्ये एका विमानाची किंमत 520 कोटी रुपये ठरली होती. मात्र नव्या करारात अचानक एका विमानाची किंमत 1600 कोटी रुपये झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या करारामुळे अनिल अंबानी यांना फायदा पोहोचवण्यात आल्या आरोप राहुल गांधींनी केला होता.
मात्र राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आणि दुर्दैवी असून सत्याचाच विजय होईल, असं अनिल अंबानी म्हणाले.
राफेल करार प्रकरणात तुमच्या कंपनीने 5000 कोटी रुपयांच्या मानहानीच्या केसमधून काँग्रेस अध्यक्षांना वेगळं का ठेवलंय असा प्रश्न अनिल अंबानी मीडियाने विचारला. त्यावर अंबानी म्हणाले की, "मी वैयक्तिकरित्या राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. काँग्रेसकडे चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती आहे, जी द्वेष, स्वार्थ हेतू आणि प्रतिस्पर्धी भावनेने प्रेरित आहे."