मुंबई : महाराष्ट्रासह देशातच नव्हे... तर जगभरात मराठीचा झेंडा फडकवणाऱ्या मराठमोळ्या रत्नांचा माझा सन्मान या पुरस्काराने गौरव करण्यात आला. एबीपी माझाच्या माझा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात समाजसेवा, कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.

या कार्यक्रमात एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. तुम्हाला एकमेकांना पुरस्कार द्यायचा झाला, तर कोणत्या गुणांसाठी द्याल, असा प्रश्न दोघांनाही विचारण्यात आला, तेव्हा त्यांच्यात जुगलबंदी रंगली.

एक चांगले चित्रकार म्हणून आपण उद्धव ठाकरे यांना पुरस्कार देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले. तर एक चांगला मित्र म्हणून आपण देवेंद्र फडणवीस यांना पुरस्कार देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दोघांनी यावेळी काही आठवणींनाही उजाळा दिला.



यानंतर या दोघांमध्ये आणखी एक जुगलबंदी रंगली.. जणू कट्ट्यावरचे प्रश्न या सोहळ्यात विचारले गेले.. त्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी काय उत्तर दिलं, ते व्हिडीओमध्ये पाहा...



कुणाकुणाला माझा सन्मान?

क्रिकेट क्षेत्रात उगवता तारा पृथ्वी शॉ, अभिनेत्री अमृता खानविलकर, सामाजिक कार्यकर्ते अफरोज शाह, शास्त्रीय संगीतातले महारथी शौनक अभिषेकी, दिग्दर्शक मधुर भांडारकर,  डॉ. शैलेश पुणतांबेकर, डॉ. अविनाश पोळ, अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांना यंदाचा मानाचा माझा सन्मान प्रदान करण्यात आला.

एबीपी माझावर हा संपूर्ण पुरस्कार सोहळा तुम्हाला आज (9 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता पाहता येणार आहे.

संबंधित बातम्या :

जगभरात मराठीचा झेंडा फडकवणाऱ्या रत्नांना 'माझा सन्मान'

ज्यांनी उंचावली महाराष्ट्राची शान, त्या रत्नांना 'माझा सन्मान'