मुंबई: सध्या सगळ्याच गोष्टींमध्ये डिजीटलायझेशन सुरु आहे. यंदा गणपती बाप्पाही डिजीटल होत आहेत. घाटकोपरच्या एका अवलियाने आधुनिक तंत्रज्ञान वापरुन उत्तम प्रकारच्या गणेश मूर्ती बनवल्या आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्या मूर्ती आता आकर्षणाचा विषय ठरत आहेत.


घाटकोपरच्या साईनाथ नगर विभागात प्रांजल गणेश कला केंद्रात विविध तंत्रज्ञान वापरून गणपतीची मूर्ती आकर्षक करण्याचा प्रयत्न मूर्तीकार नितीन चौधरी यांनी केला आहे. वेगवेगळे सॉफ्टवेअर आणि मोटार्सचा वापर करून या मूर्ती  बनवण्यात आल्या आहेत. यापैकी काही मूर्तींना रिमोटनं ऑपरेट करता येतं.

विविध सॉफ्टवेअर, मोटर्स, सेन्सरद्वारे मूर्तींमध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच मूर्तीच्या आतच एलईडी लाईट फिट करून, रिमोटद्वारे त्या हाताळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

या मूर्ती थोड्या महाग जरी असल्या तरी या मूर्तीसाठी फार आरास करण्याची अथवा वीजेच्या रोषणाईंची गरजही लागत नाही.