डोंबिवलीत चाळीतील घरांवर झाड कोसळलं, चिमुरडीसह तिघे जखमी
एबीपी माझा वेब टीम | 05 Aug 2016 06:03 PM (IST)
डोंबिवली: डोंबिवलीच्या सागाव येथील चाळीवर 100 वर्ष जुनं झाड कोसळून 6 घरांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत एका लहान मुलीसह तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सागाव येथील संघवी गार्डनमागे 100 वर्ष जुनं झाडं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं झाडाच्या मुळाजवळची माती वाहून गेली होती. त्यामुळं कृष्णा पाटील नावाच्या चाळीवर हे झाड कोसळलं. कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन झाड हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मात्र झाडाचा आकार मोठा असल्यानं झाड हटवण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचं समजतं आहे.