मुंबई : मुंबईकरांच्या स्वप्नातलं घर अर्थात म्हाडाच्या लॉटरीसाठी लाखो जणांनी अर्ज केले आहेत. आज तात्पुरत्या पात्र अर्जांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 69 अर्ज तात्पुरते अपात्र ठरले आहेत.

 

अपात्र ठरलेल्या अर्जदारांना 8 ऑगस्ट 2016 दुपारी 1.00 वाजेपर्यंत अर्जातील त्रुटी सुधारुन अर्ज पुन्हा जमा करता येणार आहे.

 

म्हाडाच्या लॉटरीसाठी एकूण 1,69,702 जणांनी अर्ज केला होता. मात्र, 1,25,219 जणांनी त्यासाठी आवश्यक अनामत रक्कम भरली होती. त्यातील 69 जणांचे अर्ज तात्पुरते अपात्र ठरले आहेत.

 

म्हाडानं मुंबई विभागातल्या 972 घरांसाठी 22 जून 2016 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. आलेल्या लाखो अर्जांची छाननी करुन अपात्र अर्जाची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. आता
पात्र अर्जांची अंतिम यादी ही 8 ऑगस्ट 2016 दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येईल.
दरम्यान, एकीकडे रियल इस्टेट बाजार मंदावला असला तरीही दुसरीकडे म्हाडाच्या घरांसाठी मोठी पसंती पाहायला मिळते आहे.

 

म्हाडाच्या वेबसाइटवर तुम्हाला पात्र अर्जांची यादी पाहता येईल.

 

या घरांसाठी लॉटरी पद्धतीने निकाल 10 ऑगस्टला जाहीर होईल.