मुंबई: मुंबईच्या रस्त्यावर यापुढे गाडी चालवताना नियम तोडणं कुणालाच परवडणारं नाही. कारण मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागानं पाच पट दंड आकारण्याची तयारी केली आहे. दंडाची रक्कम वाढवण्याची तरतूद मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, येत्या महिनाअखेर त्याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

 

यापैकी एका मोहिमेच्या माध्यमातून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोलला मुकावं लागू शकतं कारण लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' मोहीम 1 ऑगस्ट पासून हाती घेतली जाणार आहे. दरम्यान, नुकतंच केरळमध्येही 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' याची घोषणा करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता मुंबईतही ही मोहीम राबविण्यात येत आहे.

 

याशिवाय वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिली आहे.