मुंबईः मिरची, कोबी, गवार अशा भाज्यांचे दर सध्या किलोमागे शंभरच्या वर पोहचले आहेत. मात्र, यामागे बड्या व्यापाऱ्यांचंच कारस्थान असल्याची चर्चा सुरु आहे. कारण, भाजीपाला आणि फळांना बाजार समित्यांमधून सरकारनं मुक्त केलं आहे, ज्याला व्यापाऱ्यांचा मोठा विरोध आहे.

 



 

व्यापाऱ्यांनी यासाठी गेल्या चार दिवसांपासून संप पुकारुन बाजार समित्या बंद ठेवल्या आहेत. मात्र, शेतकर्यांनी या संपाला न घाबरता आपल्या शेतमालाची विक्री स्वतःच सुरु केली आहे.

 



 

मात्र, असं असलं तरी किरकोळ व्यापाऱ्यांकडून शेतमालाची खरेदी केली जात आहे. हेच किरकोळ व्यापारी बाजारात अव्वाच्या सव्वा दरानं भाजीपाला विकत आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात महागाईमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

 

 



व्यापाऱ्यांच्या या संपाने सर्वसामान्यांच्या ताटातील टोमॅटो, वांगी हे पदार्थ पळवले आहेत, असंच म्हणावं लागेल. भाज्यांचे दर 100 रुपयांपर्यंत गेल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे.

 



 

पाहा भाजीपाल्याचे सविस्तर दर