मुंबई: गगनाला भिडणाऱ्या पेट्रोल दराने मुंबईत विक्रमी दर नोंदवला आहे. मुंबईत रविवारी पेट्रोलसाठी लिटरमागे तब्बल 86.25 रुपये मोजावे लागले होते, आज पेट्रोलने त्यापुढे मजल मारत 86.56 रुपयांपर्यंत मजल मारली आहे. हा मुंबईतील आजपर्यंतचा सर्वोच्च दर आहे. यापूर्वी मुंबईत 29 मे रोजी पेट्रोल दर 86.24 रुपये होता, तो विक्रम काल मोडला. आज पेट्रोलदराने त्यापुढे मजल मारली. मुंबईचा कालचा पेट्रोल दर हा मेट्रो सिटीमधीलही सर्वात जास्त दर होता.
दुसरीकडे डिझेलही पेट्रोल दराला गाठत आहे. कारण पेट्रोलने नवा उच्चांक गाठल्यानंतर डिझेलनेही आगेकूच कायम ठेवली. डिझेलला रविवारी प्रतिलिटर 75.12 रुपये मोजावे लागले.
महाराष्ट्रात अमरावतीत महाग पेट्रोल
महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. अमरावतीतील आजचा पेट्रोल दर हा 87.81 रुपये प्रति लिटर इतका आहे. त्यानंतर औरंगाबदचा नंबर लागतो. औरंगाबादेत पेट्रोल 87.61 रुपये प्रति लिटर दर आहे.
महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर
मुंबई – 86.56
पुणे 86.36
ठाणे – 86.64
नाशिक 86.94
औरंगाबाद – 87.61
नागपूर – 87.04
कोल्हापूर 86.74
अमरावती – 87.81
सिंधुदुर्ग – 87.48
अहमदनगर – 86.41
आंतरराष्ट्रीय बाजाराचा फटका
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतारामुळे, भारतातील इंधनाचे दर वाढत आहेत, असं पेट्रोल डिलर फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे उदय लोध यांनी सांगितलं.
शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने त्याचा थेट परिमाणही पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत असल्याचं लोध म्हणाले. सरकारने एक्साईज ड्युटी आणि अन्य करात कपात करणं गरजेचं आहे, तरच इंधनाचे दर आटोक्यात येतील, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या
स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच
डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं