मुंबई : मध्य आणि हार्बर लाईनवर आज (रविवार, 17 मार्च ) रेल्वेरुळावरील डागडुजीसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच मेगा ब्लॉक असल्याने रोजच्या तुलनेत लोकल्समध्ये गर्दी जास्त असण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
आज सकाळी 11.25 ते दुपारी 3.21 दरम्यान मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात डाऊन धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
त्यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर लोकल उपलब्ध नसतील. रविवारी जलद लोकल्सना अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहेत. तसेच मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे.
सोईसुविधा आणि डागडुजीसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवाशांनी संयम बाळगावा असं आवाहन रल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Mar 2019 09:18 AM (IST)
आज सकाळी 11.25 ते दुपारी 3.21 दरम्यान मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात डाऊन धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -