मुंबई : मुंबईकरांना आता तिरुपती बालाजीचं सहजरित्या दर्शन घेता येणार आहे. मुंबईत तिरुपतीचा वैभवोत्सव साजरा करण्यात येतो आहे. सायनमध्ये सोमय्या ग्राऊंडवर या वैभवोत्सवचं आयोजन करण्यात आलं आहे.


आजपासून या उत्सवाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक बालाजीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आता पाच दिवस वेगवेगळ्या पद्धतीची पूजा करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे 14 राज्यांच्या आधी या उत्सवासाठी महाराष्ट्राचा नंबर लागला आहे. महाराष्ट्रानंतर न्यूजर्सीमध्ये या उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. बालाजी देवस्थानच्या ट्रेस्टींनीही या आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. या आयोजनासाठी साधारणपणे दोन कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

दर्शनाच्या वेळी भाविकांसाठी सगळ्या पद्धतीची सोय येथे करण्यात आली आहे. 12 तारखेपर्यंत मुंबईकरांना काही अंतरावर बालाजीचं दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.