हार्बरवर 12 डब्यांच्या आणखी 11 लोकल धावणार!
एबीपी माझा वेब टीम | 17 May 2016 01:05 PM (IST)
मुंबई: हार्बर मार्गावरच्या वाढत्या गर्दीमुळे काही दिवसांपूर्वीच 12 डब्यांच्या लोकल सुरु करण्यात आल्या. आता हार्बरच्या प्रवाशांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे आजपासून 12 डब्यांच्या आणखी नव्या 11 लोकल हार्बरवर धावणार आहे. 29 एप्रिलपासून १२ डब्ब्याची लोकल हार्बरवर सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 25 बारा डब्यांच्या लोकल आता हार्बरवर धावणार आहे. हार्बरवर 12 डब्यांच्या लोकलची मागणी अनेक वर्षापासून सुरु होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वे मार्गावर 72 तासांचा मेगाब्लॉकही घेतला होता. डीसी टू एस विद्युतप्रवाह परिवर्तन झाल्यानंतर मध्य रेल्वेने 12 डब्यांची लोकल चालवण्याला प्राधान्य दिलं होतं. इतकंच नाही तर 12 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी देखील वाढवण्यात आली आहे. 12 डब्यांच्या लोकलमुळे प्रवासी क्षमता 33 टक्क्यांनी वाढणार असून त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. 12 डब्यांच्या नव्या 11 लोकल चं वेळापत्रक: