नवी मुंबई : राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे- बेलापूर हायवेवर तीन उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. मात्र ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. एमएमआरडीएने 200 कोटी खर्च करून घणसोली, महापे आणि तुर्भे येथे तीन उड्डाणपूल बांधले आहेत.


या तीनही उड्डाणपूल आणि सबवेचं काम पूर्ण झालं असले तरी उद्घाटन न केल्याने पडून आहेत. ठाणे- बेलापूर हायवेला मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यातच मुंब्रा बायपास येथे काम हाती घेण्यात आल्याने जड वाहनांची ट्राफिक ऐरोली मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन लवकर केल्यास होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर होऊ शकते. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी या उड्डाणपुलांची पाहणी केली. हे सर्व उड्डाणपूल वाहतुकीसाठी त्वरित सुरु करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

येत्या चार दिवसात नवीन उड्डाणपूल सुरू न केल्यास शिवसेना स्वत: जबरदस्ती करेन, अशा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला.