मुंबई: शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला काल रात्री मुंबईच्या विलेपार्लेतून अटक करण्यात आली.


दिपककुमार प्यारेलाल गुप्ता असं या व्यक्तीचं नाव आहे. तो मूळचा जळगावचा असून त्याने यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी देणारे एसएमएस येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केली होती. मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेन भारती आणि पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे त्यांनी तक्रार दिली होती.

निलम गोऱ्हेंनी दिलेल्या माहितीनुसार 21 फेब्रुवारीला संध्याकाळी त्यांना धमकी देणारा मेसेज आला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे निलम गोऱ्हेंनी फोन बंद केला. मात्र, गोऱ्हे यांच्या दुसऱ्या फोनवर 27 तारखेला धमकीचा मेसेज आला. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

संबंधित बातम्या:

शिवसेना नेत्या निलम गोऱ्हेंना जीवे मारण्याची धमकी