मुंबई: राज्यातल्या एसीबीचा तपास कुचकामी असून शिक्षा होणाऱ्याचं प्रमाण फारच घटलं आहे. त्यामुळे मुंबई नालेसफाई घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत.


भाजपचे पदाधिकारी अॅड. विवेकानंद गुप्ता यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यात नालेसफाईच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत कंत्राटदार आणि पालिकेतील अधिकारी यांचं साटंलोटं असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गेल्यावर्षी १९ आणि २० जुलैला झालेल्या मोठ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती.

यावर पालिकेनं आपली बाजू मांडताना स्पष्ट केलं आहे की, यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झाली असून दोषी अधिकाऱ्यांवर चौकशीअंती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी सध्या सुरू आहे.

संंबंधित बातम्या:

मुंबईतील नालेसफाई घोटाळा, पाच कंत्राटदारांना अटक