आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मुंबईत विराट मोर्चा
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 01:50 PM (IST)
मुंबई : दादरमधील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. भर पावसात या मोर्चाला महाराष्ट्रभरातून लाखो लोकांनी सहभाग नोंदवला. भायखळ्यातून निघालेला सीएसटीजवळ पोहोचला तिथेच मोर्चाचं रुपांतर रॅलीत झालं. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. या मोर्चाला सीताराम येचुरी, कन्हैया कुमार यांनीही हजेरी लावली आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. कन्हैया कुमारने आपल्या खास शैलीत राज्य सरकारवर निशाणा साधला. 30 जुलैपासून श्रमदान करुन पुन्हा दादरमध्ये आंबेडकर भवन उभारु असा निर्धार यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय. दादरमधील आंबेडकर भवनाची इमारत पुर्नविकासासाठी पाडण्यात आली होती. त्यानंतर आंबेडकर ट्रस्ट आणि आंबेडकर कुटुंबियांमध्ये वाद झाला.