मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर कलिना फ्लायओव्हरजवळ दोन गाड्यांच्या धडकेनंतर दोन्ही गाड्यांनी अचानक पेट घेतला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

 

पश्चिम द्रुतगती महामार्गावर कलिना फ्लायओव्हरजवळ स्विफ्ट कारने अचानक ब्रेक दाबल्याने पुढे असलेल्या गाडीला स्विफ्ट धडकली. अचान ब्रेक लावल्याने मागच्या गाडीलाही अचानक थांबता आलं नाही. त्यामुळे मागे असलेल्या डस्टर कारने स्विफ्टला धडक दिली. या धडकेने स्विफ्टच्या मागील बाजूने पेट घेतला. शिवाय, डस्टरनेही पेट घेतला.

 

त्यानंतर स्विफ्टच्या चालकाने आजूबाजूच्या रहिवाशांच्या मदतीने आग विझवली. रहिवाशांनी गाडीच्या काचा फोडल्या. त्यामुळे स्फोट टाळता आला. शिवाय, अग्निशमन दलाच्या जवानही घटनास्थळी वेळेवर पोहोचले. त्यामुळे जीवितहानी टळली.

 

पाहा व्हिडीओ :