चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याचा युवासेनेशी संबंध नाही: शिंदे

Continues below advertisement
ठाणे: ठाण्यातील किसननगर भागात एका चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी प्रसाद धाडवे या तरुणाला अटक झाली आहे. हा तरुण युवासेनेचा पदाधिकारी असल्याचे समोर येत असताना, त्याच्याशी शिवसेना अथावा युवासेनेचा संबंध नसल्याचे ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. काल ठाण्यातील किसननगर भागातील एका चिमुकलीवर शिवाजी धावडे याने अत्याचार केला होता. या घटनेनंतर त्या चिमुकलीला सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर धावडेला श्रीनगर पोलिसांनी तत्काळ अटक केली. यावर ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे व युवासेना सचिन पुर्वेश सरनाईक यांनी प्रसिद्धी पत्रक काढून शिवाजी प्रसाद धाडवे या तरुणाचा शिवसेना संघटनेशी अथवा युवासेनेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्याकडून साडेचार वर्षाच्या मुलीवर बलात्कार शिवसेनेने मुलींचा आणि महिलांचा नेहमीच सन्मान केला असून, माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करणारे नराधम शिवसेना अथव युवासेनेशी संबंधित असूच शकत नाहीत. त्यामुळे शिवसेना वा युवासेनेची होणारी बदनामी थांबवावी व सदर दोषी तरुणास कठोर शिक्षा करावी, अशी मागणी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola