नवी दिल्लीः Huawei ने भारतात ऑनर 8, ऑनर 8 स्मार्ट आणि हॉली 3 हे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत.  हॉली 3 हा कंपनीचा पहिलाच 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन आहे. अभिनेता रनदीप हुडाच्या हस्ते या फोनचं अनावरण करण्यात आलं.


ऑनर 8 ची किंमत 29 हजार 999 रुपये, ऑनर 8 स्मार्टची 19 हजार 999 रुपये आणि हॉली 3 ची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. ऑनर 8 विक्रीसाठी केवळ अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर ऑनर 8 स्मार्ट आणि हॉली 3 ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने खरेदी करता येऊ शकतात.

ऑनर 8 चे फीचर्सः

  • 5.2 इंच आकाराची एचडी स्क्रीन

  • 950 ऑक्टा कोअर प्रोसेसर

  • अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो सिस्टीम

  • 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा, एलईडी फ्लॅश

  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 3000mAh क्षमतेची बॅटरी

  • फिंगरप्रिंट स्कॅनर


ऑनर 8 स्मार्टचे फीचर्सः

  • 5.2 इंच आकाराची एचडी स्क्रीन

  • 2 GB रॅम, 16 GB स्टोरेज

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 3000mAh क्षमतेची बॅटरी


हॉली 3 चे फीचर्सः

  • 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन

  • 2 GB रॅम, 16 GB स्टोरेज

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो सिस्टीम


https://twitter.com/HiHonorIndia/status/786123448967979008