मुंबई : अकरावी प्रवेशाच्या प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये मुंबई विभागातून 45 हजार 402 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. मुंबई विभागात अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी कोटा वगळून 1 लाख 19 हजार 171 जागा उपलब्ध होत्या. त्यातील 1 लाख 16 हजार 80 जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये जागा अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना 18 डिसेंबरपर्यंत आपले प्रवेश निश्चीत करू शकणार आहेत.
अकरावी प्रवेशाच्या नियमित अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांकडून प्रसिद्ध करण्यात आली असून अनेक नामांकित महाविद्यालयांच्या जागा फुल्ल झालेल्या पहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे तेथील प्रवेश बंद करण्यात आले असून ज्या महाविद्यलयात जागा उपलब्ध आहेत. तेथील कट ऑफ गुणांमध्येही वाढ झाल्याने आता महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात शिल्लक जागेवर आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.
अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 6 हजार 179 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे 8 हजार 86 विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, 6 हजार 837 विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. चौथ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 6 हजार 57 तर पाचव्या पसंतीचे महाविद्यलय मिळालेल्याची संख्या 5 हजार 173 इतकी आहे.
विशेष म्हणजे तिसऱ्या गुणवत्ता यादीत अलॉटमेंट मिळालेल्या 45 हजार 402 विद्यार्थ्यांपैकी 42 हजार 366 विद्यार्थी हे राज्य मंडळाचे आहेत. आयसीएसईच्या 1289 तर सीबीएसईच्या 1136 विद्यार्थ्यांचा तिसऱ्या गुणवत्ता यादीत समावेश आहे.
तिसऱ्या फेरीत :
कला - एकूण शिल्लक जागा 14,557 - कॉलेज मिळालेले विद्यार्थी 3908
वाणिज्य - एकूण शिल्लक जागा - 63,359 कॉलेज मिळालेले विद्यार्थी - 28,839
विज्ञान - एकूण शिल्लक जागा 38,869 - कॉलेज मिळालेले विद्यार्थी - 12,453
एकूण शिल्लक जागा - 1,19,171 कॉलेज मिळलले विद्यार्थी - 45,402
संबंधित बातम्या :
Engineering and Pharmacy Admission | इंजिनिअरिंग, फार्मसीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया