नाशिक : जे पालक शाळाची फी भरणार नाहीत त्यांच्या पाल्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा इशारा नाशिक स्कूल असोसिएशनने घेतला आहे. संस्था चालकांच्या या निर्णयाने पालकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही असा पवित्रा शिक्षण विभागाने घेतला आहे.
मुलांच्या शिक्षणसाठी पालकांनी अँन्ड्रॉईड मोबाईल फोन, लॅपटॉप खरेदी केले. इंटरनेटचा अतिरिक्त खर्च पालक भरत आहेत. अशीच परिस्थिती शहरातील बहुतांश घरात बघायला मिळते असून हाजारो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणात येणारे अडथळे पार करून आहे त्या परिस्थितीशी जुळवून शिक्षणाची भूक भागवत आहेत. मात्र या पैकी अनेकांच्या ऑनलाइन शिक्षणाला ब्रेक लागतो की काय अशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकच्या इंग्रजी माध्यम शाळांच्या स्कूल ऑफ असोसिएशनने पालकांना 7 दिवसांची मुदत दिली आहे. ज्या पालकांनी वेळेनुसार फी भरली नाही त्यांच्या मुलांचे ऑनलाइन शिक्षण शिक्षण बंद करण्याचा इशारा संस्थाचालकांच्या असोसिएशनने घेतला असून शिक्षण उपसंचालकांना या संदर्भात निवेदन दिले आहे. संस्था चालकांच्या या निर्णयाने पालकांची पायाखालची जमीन सरकली असून संस्था चालकांचा निर्णय अन्यायकारक असून शासनाने गंभीरतेने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
जून महिन्यापासून म्हणजेच 7 ते 8 महिन्यांपासून ऑनलाइन शाळा सुरू आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे शिक्षकांचा पगार, शाळेचा खर्च भरून काढण्यासाठी पालकांनी फी भरणे गरजेचे आहे. अनेक पालकांनी 8 महिन्यापासून फी भरली नाही. अशा पालकांनी काहीतरी फी भरावी ज्यांना कोणाला अडचण असेल त्यांनी प्रत्यक्ष येवून भेटावे त्यांना सवलत देऊ असा भूमिका शिक्षण संस्थाचालक घेत आहेत.
शिक्षण बाजारीकरण मंचने संस्था चालकांनी केलेया खर्चचे ऑडिट सादर करण्याची मागणी केली आहे. तर शिक्षण उपसंचालकांनी एकाही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले असून परिपत्रक काढणार असल्याची माहिती दिली आहे. एकीकडे सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शासन पावले उचलत आहेत. अशा वेळी संस्थानी पुढे येऊन पालक आणि विद्यार्थ्यांना धीर देण गरजेचे आहे. शिक्षण संस्था शिक्षणाच्या वाटा बंद करण्याचा इशारा देत असल्याने याचे पालकवर्गात येत्या काळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
Online School | ऑनलाईन शाळेतील दांडीबहाद्दर शिक्षकांना शाळेत हजेरी बंधनकारक