CCTV : वाईन शॉपमध्ये चोरी, दारुच्या बाटल्यांसह गल्ल्यावर डल्ला
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2018 10:35 PM (IST)
दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही सारी घटना कैद झाली असून, भिवंडी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
NEXT PREV
भिवंडी (मुंबई) : भिवंडी शहरात घरफोडीचे प्रकार सुरुच आहेत. शहरातील कामतघर या परिसरात असलेल्या जे. एस. वाईन्स शॉपच्या दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अज्ञात चोरट्याने दुकानामधील भिंत फोडून वाईन्सच्या दुकानात प्रवेश केला. या चोरट्यांनी दुकानातून दारुच्या बाटल्या आणि दुकानाच्या गल्ल्यावरही डल्ला मारला. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही संपूर्ण घटना कैद झाली असून, भिवंडी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या घरफोडीच्या प्रकारांमुळे भिवंडीकर त्रस्त झाले आहेत. पाहा CCTV :