मुंबई : फेरीवाल्यांना विरोध केला म्हणून घरात घुसून एक महिला आणि तिच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला. महालक्ष्मी रमानी असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.


महालक्ष्मी रमानी या मुलुंडच्या एमजी रोड परिसरातील लोहना महापरिषद ट्रस्ट या इमारतीत राहतात. त्यांच्या इमारतीबाहेर लावण्यात आलेल्या वडापावच्या गाडीला त्यांनी विरोध केला असता या वडापावच्या गाडीवरील काम करणाऱ्या राज सोनालीला, अनिल सोनालीला, प्रतिमा सोनालीला आणि पलक सोनालीला या चौघांनी या महिलेच्या घरात घुसून तिला शिवीगाळ करत तिच्यासह घराच्यांना मारहाण केली.

स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी या चौघांना अटक केली असून त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या फेरीवाल्यांविरोधात याआधीही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती, परंतु कुठलीच कारवाई न झाल्यामुळे या फेरीवाल्यांची मुजोरी कायम राहिली आणि या फेरीवाल्यांनी थेट घरात घुसून रमानी परिवाराला मारहाण केली.

संबंधित बातम्या

पत्नीविरुद्ध शेरेबाजी करण्यास हटकल्याने फेरीवाल्यांची पीएसआयला मारहाण


भाईंदर : मनसेच्या विभागप्रमुखाला फेरीवाल्यांची मारहाण, नेमकं काय घडलं?