राज – उद्धव यांच्या यापूर्वीच्या भेटी
1) दरम्यान, यापूर्वी शिवसेनेच्या लोकसभेतल्या यशाबद्दल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर पुष्पगुच्छ पाठवून अभिनंदन केलं होतं. महाराष्ट्रात शिवसेनेचे 18 खासदार निवडून आल्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ पाठवला होता. 2) यापूर्वी 2012 मध्ये सुमारे साडेतीन वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. या भेटीचं निमित्त होतं उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचं. राज ठाकरे यांनी कुटुंबासह उद्धव ठाकरे यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली होती. छातीत दुखू लागल्याने उद्धव ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज यांनी पत्नीसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज-उद्धव यांच्या भेटीची ही त्यावेळची केवळ दुसरी भेट होती. 3) २३ नोव्हेंबर २००८ मध्ये राज ठाकरे बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्ताने मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावेळी उद्धव आणि राज यांची भेट झाली होती. *23 नोव्हेंबर 2008 बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्ताने राज मातोश्रीवर *16 जुलै, 2012 उद्धव ठाकरेंना छातीत दुखू लागल्याने राज ठाकरे लिलावती रुग्णालयात भेटीला *20 नोव्हेंबर, 2012 बाळासाहेबांच्या अस्थिकलशाच्या दर्शनावेळी शिवाजी पार्कवर राज-उद्धव एकत्र *3 नोव्हेंबर, 2014 राज ठाकरेंच्या मुलीला अपघात, उद्धव ठाकरे भेटीला गेले असताना राज यांची भेट *17 नोव्हेंबर, 2014 बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला शिवतीर्थावर राज-उद्धव एकत्र संबंधित बातम्याजयदेव ठाकरेंचे उद्धव यांच्यासह ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक आरोप
“शिवसेनेची धुरा बाळासाहेबांना माझ्या खांद्यावर द्यायची होती”
“उद्धवनी बाळासाहेबांना अंधारात ठेवून ‘त्या’ कागदावर सही घेतली”
शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूपत्राचा वाद, जयदेव यांची 18 जुलैपासून उलटतपासणी