नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरुन राजकीय पक्षांमध्येच फुट पडली आहे. मुंढेंवर अविश्वास आणण्याबाबत शिवसेनेत दोन मतप्रवाह झाले आहेत.
कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढेंवर अविश्वासाचा ठराव आणू नये, यासाठी शिवसेनेचे काही नगरसेवक आग्रही आहेत. येत्या मंगळवारी हा अविश्वास ठराव आणला जाणार आहे. त्यामुळे यावरुन पक्षांमध्ये अजून दुफळी माजते का? हे पाहणं महत्वाचं आहे.
प्रामाणिक आणि धोरणात्मक निर्णय घेणारा अधिकारी असं तुकाराम मुंढेंचं नावं घेतलं जातं. मात्र, महापौर, नगरसेवकांचा अवमान करणं, परस्पर निर्णय घेणं असे आरोप तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप करत, त्यांच्याविरोधात महापालिकेत अविश्वास ठराव आणण्याची तयारी राजकीय पक्षांमधून सुरु होती. पण आता त्यामध्येच मतभेद सुरु झाले आहेत.
संबंधित बातम्या
आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव
…तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे