मुंबई: शिवसेनेत माफीया आहेत हे मित्रांना 25 वर्षांनंतर कसं समजलं? असा सवाल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपला केला. ते एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते.

मराठा मोर्चा कार्टूनप्रकरणी स्वत: उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली आहे. तणाव निर्माण होऊ नये, तो निवळावा यासाठी त्यांनी माफी मागितल्याचं स्पष्टीकरण सुभाष देसाईंनी दिलं.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं व्हिजन :

  • भांडवलावाचून उद्योग अडता कामा नये – सुभाष देसाई

  • महाराष्ट्र सरकारला धोका नाही, सरकार सुरक्षित – सुभाष देसाई

  • शिवसेनेत माफीया आहेत हे मित्रांना 25 वर्षांनंतर कसं समजलं? – सुभाष देसाई

  • नव्या उद्योगांना परवाने मिळण्याची प्रक्रिया सोपी केली – सुभाष देसाई

  • भविष्याचा कोणताही विचार न करता वर्तमान सरकार चांगलं काम करत आहे – सुभाष देसाई

  • मेक इन महाराष्ट्र शिवाय मेक इन इंडिया यशस्वी नाही – सुभाष देसाई

  • आयत्यावेळी मित्राकडून पाठीत वार होण्याआधीच सावध राहणे योग्य – सुभाष देसाई

  • विधानसभा निवडणुकीतला युती तुटण्याचा अनुभव गाठीशी – सुभाष देसाई

  • कार्टून वादाप्रकरणी माफीचा प्रश्न नव्हता, तणाव निवळण्यासाठी माफी मागितली

  • उदयोन्मुख उद्योजकांच्या पाठीशी उभं राहणं, हेच सरकारचं धोरण – सुभाष देसाई

  • आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र मुंबईतील बीकेसीमध्ये सुरु – सुभाष देसाई

  • तरुणांना रोजगारासाठी इतरत्र जाण्याची गरज पडू नये, हा उद्देश – सुभाष देसाई

  • मेक इन इंडिया अंतर्गत 262 उद्योगांच्या उभारणीला सुरुवात – सुभाष देसाई

  • मेक इन इंडियाच्या अंतर्गत 3 लाख 62 हजार कोटींचे उद्योग सुरु – सुभाष देसाई

  • उद्योगपूरक शिक्षण घेतलेल्यांना निधीची कमतरता भासणार नाही – सुभाष देसाई

  • मागासवर्गीय उद्योजकांसाठी डॉ. आंबेडकर उद्योग प्रोत्साहन योजना – सुभाष देसाई

  • महाराष्ट्रात उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करण्याचं श्रेय सरकारला – सुभाष देसाई


संबंधित बातम्या


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन


शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचं व्हिजन


काँग्रेस नेते नारायण राणे यांचं व्हिजन


पाहा व्हिडीओ :