वसई : आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणाला लिव्ह इन रिलेशनमध्ये असणाऱ्या प्रेयसीने जीवाची बाजी लावून वाचविल्याचा व्हिडीओ  समोर आला आहे. रियाझ अहमद अंसारी असं या तरुणाचं नाव आहे.  वसईत गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला आहे.


रियाझसोबत लिव एंड रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका महिलेने त्याचे प्राण वाचवले आहेत. रियाझ नायगांव परिसरातील नक्षत्र टॉवर मध्ये राहत होता. रियाझ इमारती वरून उडी मारण्याच्या तयारीत असताना त्या महिलेने रियाझचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले. तब्बल 15 मिनिटे तिने हात पकडून ठेवले होते.

तब्बल 15 मिनिटे हा मृत्यूचा तांडव सुरु होता. अखेर सोसायटीच्या वॉचमॅनने तिथे जावून रियाझला वर खेचलं. रियाझ हा मानसिक तणावाखाली होता. या तणावातून त्याने आत्महत्या करण्याचा हा प्रयत्न केला आहे. घटनेपूर्वी या महिलेसोबत भांडण देखील झाले होते. परिसरातील नागरिकांनी त्यांना वलीव पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.