कल्याण : अंबरनाथमध्ये झाडांना आगी लावण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे. आता खुंटवली डोंगरावरील झाडांना लागली आग लागली असून डोंगरावरील हजारो रोपट्यांना आगीची झळ लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून या आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
काही दिवसांपूर्वीच वरप इथे मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या आणि त्यानंतर मांगरुळ इथे खासदार श्रीकांत शिंदेंनी लावलेल्या झाडांना लागली होती. राज्य सरकारच्या एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेत लावलेल्या झाडांना अज्ञातांनी आग लावल्याच्या संतापजनक घटना अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावात घडली होती. या वर्षीच्या जुलै महिन्यात कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही झाडं लावली होती.
राज्य सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होत अंबरनाथजवळच्या मांगरुळ गावात तब्बल एक लाख झाडं लावण्यात आली होती. मात्र या झाडांना आणि संपूर्ण डोंगराला अज्ञात समाजकंटकांनी आग लावली. यात थोडी-थोडकी नव्हे, तर तब्बल 20 हजार झाडं जळून खाक झाली होती.
कुणीही कितीही आगी लावल्या तरी जंगल निर्माण होणारच, असा विश्वास श्रीकांत शिंदेनीं व्यक्त केला होता. आता पुन्हा आग लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अंबरनाथमध्ये पुन्हा आग, हजारो झाडांना झळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Nov 2018 06:00 PM (IST)
खुंटवली डोंगरावरील झाडांना लागली आग लागली असून डोंगरावरील हजारो रोपट्यांना आगीची झळ लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून या आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -