ठाणे : ठाण्यातील एका महिलेचा न्यूझीलंडमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. पतीसोबत राहत असलेल्या सोनम शेलारचा मृतदेह न्यूझीलंडमधील वैरारापा नावाच्या समुद्रकिनारी सापडल्याने भारतातील तिच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.
महत्त्वाची बाब म्हणजे सोनम शेलार पाच महिन्यांची गरोदर होती. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात तिचा शेफ असलेल्या सागर शेलारशी विवाह झाला होता. त्यानंतर ती पतीसोबत न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाली होती. सोनम मूळची ठाण्यातील कोपरीमधील रहिवासी होती.
सोनम शेलार बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. अखेर बीचगार्ड्सना तिचा मृतदेह सापडला. तिचा अपघाती मृत्यू आहे की घातपात याचा तपास वेलिंग्टन पोलीस करत आहेत.
ठाण्यातील महिलेचा न्यूझीलंडमध्ये संशयास्पद मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Nov 2018 08:55 AM (IST)
महत्त्वाची बाब म्हणजे सोनम शेलार पाच महिन्यांची गरोदर होती. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात तिचा शेफ असलेल्या सागर शेलारशी विवाह झाला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -