मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ओबीसी समाजातील नेत्यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी दोन वाजता ओबीसी समन्वय समितीचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची विधीमंडळात बैठक होणार आहे.


एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याला ओबीसी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी ओबीसी नेत्यांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे वेळेची मागणी केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली असून, आज दुपारी  फडणवीस आणि ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे.

मराठा आरक्षण 5 डिसेंबरला लागू होणार : सूत्र

एसईबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण जाहीर करुन मैदान मारलं असं वाटत असतानाच आता या आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरु केला आहे. मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गात आरक्षण देणं म्हणजे ओबीसीतूनच आरक्षण देण्यासारखे असल्याचं ओबीसी नेत्यांचं मत आहे. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसी प्रवर्गातून एका टक्क्यालाही धक्का लागला तर त्याला विरोध असल्याचं ओबीसी नेत्यांनी सांगितलं.

आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता मराठा आणि ओबीसी नेते आमने-सामने आले आहेत. याचं कारण सध्याच्या ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीची श्वेतपत्रिका सरकारने काढावी, अशी मागणी मराठा समाजाने केल्यानंतर, ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. श्वेतपत्रिका काढायची असेल तर सर्वच समाजाच्या आरक्षणाची काढा अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे. 1994 मध्ये काढलेल्या जीआरमध्ये ओबीसींचे आरक्षण 14 टक्के होते. नंतर ते थेट 30 टक्क्यांवर नेण्यात आले. त्यामुळे वाढीव 16 टक्क्यांचं आरक्षण हे अनधिकृतरित्या वाढवण्यात आल्याचा दावा मराठा समाजाच्या मंथन परिषदेतनं करण्यात आला.

संबंधित बातम्या

सरकार मराठा आरक्षणाच्या अहवालावर एटीआर मांडणार

मुख्यमंत्री का घाबरत आहेत? : जयंत पाटील

29 नोव्हेंबरला मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब?