अचानक आलेल्या पावसामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या डावीकडे कलंडली. आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. सुदैवाने प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र, बसचालकाला दुखापत झाली असून, त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.