मुंबई: सध्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे. 30 जूनपर्यंत आधार आणि पॅन लिंक करणं अनिवार्य आहे. मात्र जर ते लिंक केलं नाही तर काय होईल? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 30 जून ही मुदत असली तरी ती शेवटची नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. कारण 30 जून नंतरही तुम्ही आधार आणि पॅन लिंक करु शकता.
1 जुलैपासून आधार आणि पॅन लिंक असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पॅन नंबर आहे, त्यांना ते आधारसोबत लिंक करावं लागेल.
पॅन कार्ड नसेल तर?
जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, मात्र आधार कार्ड आहे, तर तुम्हाला पॅन कार्ड काढताना फॉर्मवर आधार नंबर लिहावा लागेल.
म्हणजेच 1 जुलैपासून आधार आणि पॅन लिंक करणं अनिवार्य होईल. आधार आणि पॅन लिंक केलं नाही तर काय होईल?
आधार आणि पॅन लिंक न केल्यास,
इन्कम टॅक्सच्या एका अधिसूचनेनुसार, जर आधार आणि पॅन लिंक केलं नाही तर तुमचा पॅन नंबर निष्क्रीय होईल. तसंच तुम्ही पॅनसाठी अर्जच केला नव्हता असं मानण्यात येईल.
मात्र या अधिसूचनेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे पॅन नंबर कधी निष्क्रिय होईल आणि हा नियम कधी लागू केला जाईल याबाबत अस्पष्टता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सरकार येत्या काळात एक तारीख जाहीर करु शकतं. त्या तारखेपर्यंत पॅन कार्ड हे आधारसोबत लिंक नसेल तर तेव्हा तुमचं पॅन निष्क्रिय केलं जाऊ शकतं. मात्र त्या तारखेची घोषणा अद्याप झालेली नाही.
ज्यांच्याकडे आधार नाही
ज्यांच्याकडे आधार कार्डच नाही, त्यांचं पॅनकार्ड रद्द करु नये, असे आदेश नुकतंच सुप्रीम कोर्टाने आयकर विभागाला दिले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार नाही त्यांना काहीसा दिलासा आहे, मात्र सध्या तरी आधार कार्ड नसलेल्या लोकांची संख्या तुलनेने कमी आहे.
संबंधित बातम्या
आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!