53 वर्षीय आरोपी मूळचा बिहारचा आहे. आरोपी टेंपो चालवतो. या आरोपीने अडीच वर्षीय मराठी मुलीसोबत बलात्काराचा प्रयत्न केला. तो व्हिडीओ व्हायरल होत होता. त्याला मनसेने पकडलं, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.
परप्रांतीय विकृतांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने कारवाई करेल, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला. या आरोपीने आतापर्यंत तीन लहान मुलींशी असं कृत्य केलं आहे. मात्र हा व्हिडीओ आल्याने त्याचं कृत्य समोर आल्याचं जाधव यांनी सांगितलं,
ठाण्यात अडीच वर्षांच्या एका चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या एका विकृताचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी त्या विकृताला बेदम चोप दिला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसही आरोपीचा शोध घेत होते.
दुसरीकडे काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासारख्यांना महाराष्ट्रातून हकलायला हवं. संजय निरुपम ही घाण आहे. मराठी आणि यूपी बिहारींच्यात वाद करुन राजकारण करायचं हा त्यांचा धंदा आहे. मराठी माणसांनी एकत्र येऊन संजय निरुपमांना हाकलावं असंही अविनाश जाधव म्हणाले.