भिवंडीत प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही आयुष्य संपवलं
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2018 08:57 AM (IST)
भिवंडीत राहणारी 20 वर्षीय आरती गुरुनाथ भोईर आणि 23 वर्षीय रोशन बाळाराम रंधवी या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली.
भिवंडी : 'एक दुजे के लिए' या हिंदी चित्रपटातील कथानकासारखीच हृदयद्रावक घटना भिवंडीत समोर आली आहे. प्रेयसीने आत्महत्या केल्याची बातमी समजताच प्रियकरानेही गळफास घेऊन आयुष्य संपवलं. प्रेमसंबंध आणि लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होईल, या भीतीने प्रथम प्रेयसीने बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेयसीच्या आत्महत्येची बातमी समजताच प्रियकरानेही आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भिवंडीत राहणारी 20 वर्षीय आरती गुरुनाथ भोईर आणि 23 वर्षीय रोशन बाळाराम रंधवी या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. दोघांच्या आत्महत्येची नोंद दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सिकंदराबादमध्ये गर्लफ्रेण्डसोबत चॅटिंग करताना पत्नीने हटकल्यानंतर पतीने भीतीपोटी आत्महत्या केली होती, तर विरहातून गर्लफ्रेण्डनेही आपलं आयुष्य संपवलं होतं.