मुंबई: ‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ अशी परिस्थिती सध्या शिवसेनेची झाली आहे. कारण मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेत मंत्रिपदांवरुन वादावादीला सुरुवात झाली आहे. बरं शिवसेनेला जरी मंत्रिपदं मिळाली तरी आता केवळ 8-10 महिनेच निवडणुकीला राहिली आहेत. त्यामुळे पाच वर्षात जे झालं नाही त्यावरुन शेवटच्या काही महिन्यांसाठी शिवसेनेत वाद सुरु झाले आहेत.
दसऱ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा शिवसेनेत सुरु आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या ग्रामीण भागातल्या आमदारांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेत चढाओढ सुरु आहे.
विधानपरिषदेच्या आमदारांना मंत्रिपद देऊ नका, या मागणीसाठी ग्रामीण भागातले आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेत विधानपरिषदेचे आमदार विरुद्ध विधानसभेचे आमदार असा वाद सुरु आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिवसेनेच्या ग्रामीण भागातल्या आमदाराचं लक्ष आहे.
मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही: एकनाथ खडसे
ग्रामीण भागातल्या आमदारांना मंत्रिपद मिळावं, यासाठी काही आमदार उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. याआधीही विधानपरिषदेच्या आमदारांना मंत्रिपद दिल्यानं ग्रामीण भागातले आमदार नाराज होते.
सध्या भाजप शिवसेनामधील मंत्री वाटपानुसार आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधानामुळे भाजपाच्या एकूण चार मंत्रिपदाच्या जागा रिक्त आहेत. तर शिवसेनेचा 12 मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे. तेव्हा भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे-पाटील यांचं स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपल्याने त्यांचं मंत्रिपद जाणार हे निश्चित आहे. तर कृषीमंत्री पद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक खात्याचा आढावा घेतला.
संबंधित बातम्या
10 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, खडसेंचं कमबॅक गुलदस्त्यात
मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही: एकनाथ खडसे
'ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील'
विस्तारात अनेकांना सुखद धक्का; शिंदेंचं प्रमोशन, जानकरांची स्वप्नपूर्ती