मुंबई : मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. मात्र ठाणे महापालिकेत आघाडीबाबत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चौथी बैठक होणार आहे. प्रामुख्यानं या बैठकीत कळवा आणि मुंब्रा इथल्या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.


ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीची मक्तेदारी आहे. राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक असल्यामुळे त्यांचा वरचष्मा असेल. तर काँग्रेसची मात्र ठाण्यात अडचण झाली आहे. ठाण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

पाचपैकी मुंब्य्रातील तीन नगरसेवक राष्ट्रवादीत, तर एक शिवसेनेत गेला आहे. मात्र पाच जागांबाबत काँग्रेस आग्रही आहे. दुसरीकडे, विधानसभेत फक्त 5 हजार मतं मिळाली असताना या जागा काँग्रेसला का द्यावा, असा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत या प्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता आहे.