सिंधूताईंच्या उद्रेकानंतरही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन अपघात
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2017 09:16 AM (IST)
रायगड : मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची संख्या वाढल्याने ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी संताप व्यक्त केल्याचा प्रकार उलटून काही तास उलटत नाहीत, तोच एक्स्प्रेस वेवर दोन अपघात घडले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर गुरुवारी सकाळपासून दोन अपघात झाल्याची माहिती आहे. भाताण बोगद्याजवळ सँट्रो कारचा अपघात झाला, तर रसायनी हद्दीजवळ इको कारला अपघात घडल्याचं वृत्त आहे. सँट्रो कारच्या अपघातात गाडीतील चार जण जखमी झाले आहेत. कारचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती आहे. तर रसायनी हद्दीत झालेल्या इको कारच्या अपघातात चालक जखमी झाला आहे.