ठाणे: ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने देखील निवडणूक अर्ज वाटप केले असून इच्छुकांच्या मुलाखतीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत 350पेक्षा अधिक अर्जांचं वाटप झालं असून 200 जणांनी अर्ज भरल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजपप्रमाणे आम्हाला उमेदवार आयात करण्याची गरज नाही असा टोला मनसेनं लगावला आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही आघाडीवर अंतिम निर्णय होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरूवात केली आहे. ठाण्यातल्या 33 प्रभागांसाठी 200 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
गणेश नाईक, वसंत डावखरे, आणि जितेंद्र आव्हाड या नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. गेल्या निवडणुकीत 130 जागांपैकी 30 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे महापालिकेत विरोधी पक्षाच्या बाकावर विराजमान आहे.