मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संपूर्ण मुंबईमध्ये आपल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी 'डीड यू नो' या टॅगलाईनचे पोस्टर लावले आहेत. त्याला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचारासाठी 'यू शूल्ड नो' ही टॅगलाईन तयार करुन पोस्टरबाजी केली आहे.


राष्ट्रवादीनं या कॅम्पेनअंतर्गत शिवसेनेवर विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसंच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेनं केलेल्या विकासकामांची मुंबई महापालिकेच्या कामांशी तुलना केली आहे.



राष्ट्रवादी काँग्रेसच्या खसादार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इलेक्शन वॉररुमचंही उद्घाटन करण्यात आलं. यावेळी 'माझा'शी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपला लक्ष्य करुन शिवसेनेसोबत युती करणार असाल, तर स्वपक्षातील नेत्यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे केलेल्या आरोपांचे काय करणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या

'करुन दाखवलं'ऐवजी शिवसेनेची नवी टॅगलाईन 'डीड यू नो'

युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? : सुप्रिया सुळे