ठाणे: ठाणे मनपानं तब्बल 1800 झाडे तोडण्याची परवानगी दिल्याचं समजतं आहे. लोढा आणि कल्पतरू या दोन नामांकित बिल्डरांना ही झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती समजते आहे.

 

ठाण महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं अशी परवानगी दिल्यानं यामध्ये काही तरी आर्थिक  व्यवहार झाल्याचे आरोप होत आहे. दरम्यान, या समितीनं कल्पतरु बिल्डरला 1000 झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. तर लोढा बिल्डरला 800 झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे.

 

याआधी एक झाड तोडल्यास दोन झाडं लावण्यात यावी असा नियम होता. मात्र, बिल्डिंग उभारल्यानंतर तेवढी जागा राहत नसल्याची ओरड सुरु झाली. त्यासाठी झाडांच्या मोबदल्यात दंड भरण्याचा नियम करण्यात आला. मात्र, ठाण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं तोडण्याची परवानगी दिल्यानं यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची ठाणेकरांमध्ये चर्चा सुरु आहे.