मुंबई: राज्य सरकारनं आज नवं गृहनिर्माण धोरण जाहीर केलं. गृहनिर्माण धोरणाची पुस्तिका मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित झाली. यावेळी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आशिष शेलार आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्यात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. या कार्यक्रमात भाषण करताना आशिष शेलारांनी चांगलीच फटकेबाजी केली.

 

'साहेब मी खूप छोटा माणूस आहे'

 

'उद्धव ठाकरे मला म्हणाले आशिष तू बरेच दिवस झाले काही बोलला नाहीस? त्यावेळीच मी साहेबांनां म्हणालो... साहेब मी खूप छोटा माणूस आहे. मी जे काही बोलतो त्यामागे कृष्णनीती असते.' असं शेलार म्हणाले.

 

'मुख्यमंत्री महाराष्ट्रच्या राजकारणातले कृष्ण'

 

'महाराष्ट्रच्या राजकारणातले कृष्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. कृष्णनिती सगळं काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतात.' असंही शेलार म्हणाले.

 

'मुंबईच्या विकाससाठी फक्त घोषणा नाही तर काम करून सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत. इथला नजारा पाहून येणाऱ्या फेब्रुवारी मधील निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. ' अशीही टिप्पणी यावेळी शेलारांनी केली.

 

संबंधित बातम्या:

 

मुंबईकरांना स्वस्त आणि हक्काचं घर मिळेल: मुख्यमंत्री