ठाणे : ठाण्याच्या कोपरी मार्केट परिसरात अचानक आठ फुटांचा महाकाय अजगर आढळल्याने एकच खळबळ उडाली. कोपरी मार्केटमधील बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली.
गणपती आणि इतर खरेदीसाठी कोपरी भाजी मार्केट फुललं होतं. पण संध्याकाळी सातच्या सुमारास आठ फुटांचा महाकाय अजगर आढळल्याने उपस्थितांमध्ये घबराट पसरली. अजगर पाहिल्यावर लोकांनी पळापळ करायला सुरुवात केली.
मात्र वाहतूक पोलिस चंद्रकांत पवार यांनी प्रसंगावधान दाखवत दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून सर्पमित्राशी संपर्क केला. पण त्याचवेळी गर्दीतील एक तरुण पुढे आला आणि त्याने अजगराला पकडलं. नंतर पोलिसांच्या मदतीने अजगराला खाडी परिसरात सोडून दिलं.
हा अजगर नाल्यातून आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. पण अचानक अवतरलेल्या या अजगराने ग्राहकांची चांगलीच त्रेधा उडाली हे मात्र नक्की.
ठाण्यातील गजबजलेल्या बाजारात महाकाय अजगर, लोकांची पळापळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2017 10:08 AM (IST)
गणपती आणि इतर खरेदीसाठी कोपरी भाजी मार्केट फुललं होतं. पण संध्याकाळी सातच्या सुमारास आठ फुटांचा महाकाय अजगर आढळल्याने उपस्थितांमध्ये घबराट पसरली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -