मुंबई: गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबईत अद्यापही तब्बल 900 गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून परवानग्या देण्यात आलेल्या नाहीत.
केवळ 700-800 मंडळांना सर्व परवानग्य़ा मिळालेल्या आहेत. गणेशोत्सव मंडळांना परवानग्या देण्यासाठी सुरु करण्यात आलेली वन विंडो सिस्टीम फोल ठरली आहे. पोलिस प्रशासनाकडून दिल्या जाणा-या एनओसी रखडल्यानं गणेशोत्सव मंडळांना परवानग्या मिळाल्या नसल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.
तर, सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात म्हणून सुरु करण्यात आलेली एक खिडकी योजना, पूर्णता अयशस्वी झाल्याचं गणेशोत्सव समन्वय समितीनं म्हटलं आहे.
गणेशोत्सवाला सुरुवात, मात्र हजारो मंडळांच्या परवानग्या रखडल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2017 08:32 AM (IST)
गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबईत अद्यापही तब्बल 900 गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून परवानग्या देण्यात आलेल्या नाहीत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -