मुंबई : राज्यातील शेतकरी संपावरुन सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेना मंत्र्यांनी दांडी मारली. परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत बैठकीला गैरहजर राहिले.
मंगळवारी रात्री 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या मंत्र्याची बैठक झाली. शिवाय शेतकरी संपावर जाण्यापूर्वी शेतकरी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. परंतु या प्रक्रियेत शिवसेना कुठेच नव्हती.
या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली होती. पण वेळ न मिळाल्याने चर्चेशिवायच बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर पाच मिनिटांतच शिवसेनेचे मंत्री बैठकीतून बाहरे पडले.
मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना सुभाष देसाई आणि दीपक सावंत दिवाकर रावतेंच्या दालनातच होते.