मुंबई : हार्बर रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली असून, सीएसटी ते वडाळा दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळेस हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे.

 

हार्बर रेल्वे वडाळ्यात खोळंबली असून, तब्बल 20 मिनिटांहून अधिक वेळ हार्बर मार्गावरची वाहतूक उशीरानं सुरु आहे. कुर्ल्याहून पनवेलकडे विशेष ट्रेन सोडल्या जात आहेत, तर कुर्ला-सीएसटी सेवा ठप्प आहे.

 

पनवेलहून सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेलकडे जाण्यासाठी कुर्ल्याहून गाड्या सोडल्या जात आहेत.