मुंबई: छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अनेक भूमिकांनी रसिकांना खळखळून हसवणारे अभिनेते रझाक खान यांचं आज निधन झालं. काल त्यांना हृदयविकारचा झटका आला होता. त्यानंतर वांद्रे इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
आपल्या सिनेसृष्टीतल्या वाटचालीत त्यांनी ९० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये भूमिका केल्या.
बादशाह, हेराफेरी, हैलो ब्रदर, अखियोसे गोली मारे अशा अनेक सिनेमांमधल्या त्यांच्या विनोदी भूमिकेचं कौतुकही झालं.
महत्वाचं म्हणजे अनेक सिनेमात ज्या नावानं त्यांनी भूमिका साकारली पुढे त्याचं नावानं लोक त्यांना ओळखत राहिले.
टक्कर पहलवान, बाबू बिसलेरी सिनेमातली त्यांची अशी अनेक नावं चर्चेतही राहिली.
रज्जाक खान यांचा प्रवास
रज्जाक खान यांनी 1993 ला फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं. सर्वप्रथम त्यांनी 'रुप की राणी चोरों का राजा' या सिनेमात भूमिका वठवली. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात रज्जाक खान यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.
शाहरुख खानच्या 1999 मध्ये आलेल्या बादशाह या सिनेमात त्यांनी साकारलेली माणिकचंदची भूमिका प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहिली.
रज्जाक खान यांनी 'राजा हिंदुस्थानी', मोहरा, प्यार किया तो डरना क्या, हसिना मान जाएगी, बादशाह, हर दिल जो प्यार करेगा, यासारख्या सिनेमात अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
https://www.youtube.com/watch?time_continue=32&v=Y3431Zq1FnY