नितीश शिसोदे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याने साराच्या नावानं पाच महिन्यांपूर्वी फेक ट्विटर अकाऊंट तयार केलं होतं. पोलिसांनी मुंबईतील अंधेरी भागातून बुधवारी नितीनला बेड्या ठोकल्या. त्याला 9 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सारा तेंडुलकरच्या नावे फेक अकाऊंट, शरद पवारांवर टीका
नितीनने साराच्या नावे फेक अकाऊण्ट ओपन करुन शरद पवारांविषयी केलेलं ट्वीट अनेकांनी रिट्वीटही केलं होतं. त्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
काय होतं ट्वीट?
'शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांनी केंद्रालाही लुटायचा प्रयत्न केला, हे फारसं जगजाहीर नाही' असं ट्वीट या अकाऊंटवरुन 9 ऑक्टोबर रोजी करण्यात आलं होतं. विजय मल्ल्याने शरद पवारांचं नाव घेतल्याच्या चर्चांवरुन हे ट्वीट करण्यात आलं होतं.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन याबाबत सचिन तेंडुलकरला माहिती दिली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस, राहुल गांधी, शिवसेना, सीताराम येचुरी अशा अनेकांवरही टीका करण्यात आली होती.
सचिनच्या मुलीला सतत फोनवरुन त्रास देणाऱ्या तरुणाला कोलकात्यात बेड्या
काही दिवसांपूर्वी साराला सतत फोन करुन त्रास देणाऱ्या माथेफिरु तरुणाला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली होती. सचिनने मुंबई पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.