चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार, स्कूलबस चालकाचा पालकावर हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 08 Feb 2018 01:33 PM (IST)
बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनमध्ये बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर, ठाणे : स्कूलबस चालकांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. मुलावरील लैंगिक अत्याचाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये हा धक्कादायक प्रकरा घडला आहे. बदलापुरात राहणाऱ्या दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर स्कूल बस चालकानं लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. आरोपी बस चालकाला जाब विचारण्यासाठी बुधवारी संध्याकाळी चिमुरड्याचे पालक गेले. तेव्हा पाच जणांनी मिळून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मंगेश पाटील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनमध्ये बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.