मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या विरोधातला उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याच्या आरोपावर काल (बुधवार) एसीबीने आपला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयात दाखल केला. ज्यात दया नायक यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
या अगोदर 2010 मध्ये एसीबीकडून विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता जो न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. दया नायक यांची संपत्ती ही त्यांच्या उत्पन्नाच्या 10 टक्क्यांच्या खाली असल्याने त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करता येणार नाही.
दया नायक यांच्यावर कोणते आरोप होते?
या आगोदर एसीबीने आपल्या आरोपात म्हटले होते की दया नायक यांच्या मालकीचा 800 स्क्वेअर फुटांच चारकोप परिसरात असून , एक जीप आणि फायनान्स कंपनी असुम दया नायक यांनी 1 कोटी रुपये एका शाळेच्या बांधकामात गुंतवले असून ही शाळा त्यांच्या कर्नाटक मधील गावात आहे. या आरोपांखाली दया नायक यांना 2006 मध्ये अटक करण्यात आली होती. परंतु एसीबी कडून कुठलेही पुरावे देण्यात न दिल्याने 2016 मध्ये दया नायक यांना क्लीन चिट देत पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आले होते.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना एसीबीची क्लीन चिट
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
08 Feb 2018 12:03 PM (IST)
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना अँटी करप्शन ब्युरोने क्लीन चिट दिली आहे. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. यासंदर्भात एसीबीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात क्लीन चिट दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -