मीरा-भाईंदर (ठाणे) : मीरा-भाईंदर शहरातील कुख्यात डॉन तात्या पटेल अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तात्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. 50 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तात्या पटेलवर भाईंदरच्या एका महिलेला जिंवत जाळण्याच्या प्रयत्नात मकोका लागला होता. त्यानंतर तात्या फरार झाला होता.
कोण आहे तात्य पटेल?
अशरफ पटेल उर्फ तात्या गुलाम रसुल पटेल. एकेकाळी मीरा-भाईंदरमधील गुन्हेगारी जगतातील अनभिज्ञ सम्राट. मीर-भाईंदरमध्ये तात्याची मोठ्या प्रमाणात दहशत होती. तात्याच्या उंबरठ्यांवर स्थानिक नेते आणि गुंड सलामी ठोकतं असत, तर पोलिसांमध्येही त्याचा दरारा होता.
‘मोस्ट वॉंटेड’ असूनही तात्या खुलेआम जनता दरबार भरवत होता. ठाणे ग्रामीणच्या काशिमीरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्याला अंधेरीच्या यारी रोड येथून अटक केली.
तात्या पटेलवर वेगवगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दंगली घडवणे, सरकारी कामांमध्ये अडथळा आणणे, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे, धाक-दपटशाही करुन जागा-जमीन बळकावणे असे 50 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भाईंदरच्या एका जमिनीच्या वादामध्ये तात्याने एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये त्याला मकोका लागला होता. याच प्रकरणात तात्याला गेल्या दीड वर्षांपासून फरार होता.
सात भाऊ आणि एक बहीण अशी तात्या पटेलची एकूण आठ भावडं. त्यातील दोन भावांचा गॅंगवारमध्ये मृत्यू झाला. सर्वच भावांवर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. त्याची बहीणही लेडी डॉन या नावाने कुप्रसिद्ध होती.
तात्या पटेल याच्यावर मकोकाच्या आगोदर 20 मे 2011 रोजी आपल्याच घरात बॉडीगार्ड सुल्ताना शेख याची हत्येचा गुन्हाही दाखल झाला होता. या गुन्ह्यात तो पाच वर्ष फरार होता. मीरा-भाईंदरमध्ये यांच्या कुंटुंबाला पटेल कंपनी म्हणूनही म्हटले जाते.
‘घातक’ सिनेमा आणि तात्या पटेल
1996 साली प्रदर्शित झालेला ‘घातक’ सिनेमा तात्या पटेलच्या आयुष्यावर आधारित होता. ज्येष्ठ अभिनेते डॅनी डेंग्जोपा यांनी त्या सिनेमात भूमिका साकारली होती.
‘घातक’ तात्या पटेल अखेर पोलिसांच्या जाळ्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Apr 2018 05:37 PM (IST)
1996 साली प्रदर्शित झालेला ‘घातक’ सिनेमा तात्या पटेलच्या आयुष्यावर आधारित होता. ज्येष्ठ अभिनेते डॅनी डेंग्जोपा यांनी त्या सिनेमात भूमिका साकारली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -